Posts

तो जमाना आता गेला ज्यावेळी मराठा समाजातील लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं. म्हणून पूर्वीचे मराठा समाजातील लोकं, आज तुम्ही ज्यांना प्रेमाने "काका" किंवा "गुरुजी" म्हणता त्यांच्या पिढीजात लोकांकडे पंचांग बघायला, सल्ला घ्यायला जायचे... सोप्या रीतीने विषय समजून घेण्यासाठी आपण त्यांना 'काका' च म्हणूयात.. जगातील उत्तोमोत्तम साहित्य, ज्ञान, माहिती यांची दालनं तुमच्या या "काकांच्या" बापजाद्यांसाठी शेकडो वर्ष आधी उघडली गेली होती. त्यामुळे साहजिकच या काकांच्या बापांना आपल्या बापजाद्यांपेक्षा अधिक सामान्य आणि व्यवहार ज्ञान होतं. आता मात्र, तुम्ही मराठे शिकलाय ना? जगातलं ज्ञान घेताय ना? आपल्या बुद्धीचा वापर करून स्वतःच्या क्षमतेवर जग जिंकण्याचा तुम्हाला विश्वास आहे ना? तरीही आपल्याला त्या "काका-काकी-काकू" कडे जाण्याची गरज आजही आहे का ? आज मराठा समाजातील तरुण शिक्षीत, उच्चशिक्षीत आणि जागरूक होतोय. तरीही बरीच शिक्षीत आणि उच्चशिक्षीत मराठा तरुण मंडळी आजही अंधश्रद्धा, अनिष्ट रिती-परंपरा यांना बिलगून बसलेले आढळून येतात. आजही मराठा समाजा...
Recent posts